क्राईम न्यूजब्रेकिंगविदर्भ

जवळा येथे सुगंधीत तंबाखू, पानमसाला जप्त

 

यवतमाळ : राज्यात गुटखा बंदी असतांनाही सुंगधित तंबाखू, गुटखा, पानमसाला सर्रास विक्री होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आज एफडीएच्या पथकाने जवळा येथे दोन ठिकाणी धाड टाकली. या धाडीत दिड लाख रुपयाचा सुंगधित तंबाखू, पानमसाला जप्त केला.
जवळा येथील सुरेश खंदार व तसेच शेख रहीम शेख फरीद हे सुगंधीत तंबाखू व पानमसाला विक्री व पुरवठा होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका-यांना मिळाली होती. त्या आधारे जवळा येथील सुरेश खंदार याचे राहते घरी धाड टाकली. यामध्ये प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा साठा विक्रीकरीता साठवल्याचे आढळुन आले. सुगंधी तंबाखू, पान मसाला व इतर असा एकुण १ लाख १० हजार ३२५ रुपयाचा साठा जप्त करण्यात आला. तसेच शेख रहीम शेख फरीद याच्या घरी धाड टाकली. त्याच्या घरून २२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सदर कारवाई सहआयुक्त सु. ग. अन्नपुरे, सहायक आयुक्त कृ.रं. जयपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधीकारी गोपाल माहोरे, घ.पं. दंदे, व संदीप सूर्यवंशी यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!