ब्रेकिंग

कोरोनाचा कहर : पाच जणांचा मृत्यू, ४२९ जण पॉझेटिव्ह 

यवतमाळ : कोरोनाना संसर्ग झपाट्याने वाढत असून, जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये यवतमाळातील तीन तर पुसद येथील दोन जणांचा समावेश आहे. तर ४२९ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच २८२ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील २८, ७१ आणि ७८ वर्षीय पुरुष, तसेच पुसद येथील ४३ आणि ५७ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या ४२९ जणांमध्ये २४६ पुरुष आणि १८३ महिला आहेत. यात यवतमाळातील १३३, दिग्रस ११०, बाभूळगाव ७१, पांढरकवडा २८, पुसद २४, दारव्हा २०, महागाव १५, अर्णी ८, नेर ८, कळंब ५, घाटंजी २, वणी २, उमरखेड़ १ आणि २ इतर शहरातील रुग्ण आहेत.
बुधवारी एकूण १८६५ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ४२९ जण नव्याने पॉझेटिव्ह आले. तर १४६३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात २०७२ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या २०१७२ झाली आहे. २४ तासात २८२ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १७६११ आहे. तर जिल्ह्यात एकूण ४८९ मृत्युची नोंद आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!