कुंटनखान्यावर धाड,अल्पवयीन मुलीसह तरुणीची सुटका

वणी : येथील प्रेमनगरातील कुुंटनखान्यावर पोलिसांनी धाड टाकुन देहविक्रीच्या व्यवसायात ओढलेल्या एका अल्पवयीन मुलीसह तरुणीची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी कुंटनखाना चालविणा-या दोन महिलांना ताब्यात घेतले.
शहरातील प्रेमनगर भागात अल्पवयीन मुलींची देह विक्री होत असल्याची माहिती नागपूर येथील फ्रिडम फॅम या संस्थेनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना माहिती दिली होती. त्या आधारे मारेगाव पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार, वणी पोलीस पथक व फ्रिडम फ्रेम यांचे स्वयंसेवक वणी येथील प्रेमनगर परिसरात दाखल झाले. या प्रकरणाची खात्रीशिर माहिती गोळा करुन , कुंटनखाण्यावर छापा टाकण्यात आला. यामध्ये चाळीशीतील दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. तर एक अल्पवयीन मुलगी व २८ वर्षीय तरुणीची त्याच्या तावडीतून सुटका करण्यात आली. सदर महीला मागील कित्येक महिन्यापासून या मुलींनकडुन देहविक्री व्यवसाय करन घेत होत्या अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी महीलांकडुन ४०५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वणी पोलिसांनी महिला विरूध्द भां.द.वी कलम ३६३,३६६,(अ) ३७०(४) (१) सहकलम ३,४ अनैतिक व्यवसाय करणे या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक माया चाटसे करीत आहे.