क्राईम न्यूजब्रेकिंगविदर्भ

चाकुने भोसकुन पत्नीची हत्या

 


यवतमाळ : चारित्र्याच्या संशयावरून पतीने गळा आवळून व चाकुने भोसकुन पत्नीची निर्घृण हत्या केली. शहरातील शिवाजी नगरात आज बुधवारी सकाळी उघडकीस आली. अवधूतवाडी पोलिसांनी आरोपी पतीला जेरबंद केले.
मेघना रविराज चौधरी (३५) रा. पिंपळगाव ता. पुसद असे मृत महिलेचे नाव आहे. तर रविराज रमेश चौधरी असे आरोपीचे नाव आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी आरोपीचा अपघात झाल्याने डोक्याला मार लागला होता. त्यामुळे तो उपचार घेण्यासाठी यवतमाळात आला होता. तेव्हा पासून तो जावाई उमेश ठाकरे रा. शिवाजीनगर यवतमाळ यांच्याकडे पत्नी मेघना व पाच वर्षाच्या मुलासह राहत होता. दरम्यान मंगळवारी रात्रीच्या सुमारास गळा आवळून व चाकुने भोसकुन मेघनाची हत्या केली. आज बुधवारी ही घडना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच अवधुतवाडीचे ठाणेदार मनोज केदारे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. जावाई उमेश ठाकरे यांनी या घटनेची तक्रार अवधुतवाडी पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी अवधुतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला जेरबंद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!