ब्रेकिंगविदर्भ

बापरे ! कोरोनाचा स्फोट, ५११ नव्याने पॉझेटिव्ह , दोघांचा मृत्यू


यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट झाला असून, गेल्या २४ तासात तब्बल ५११ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बा•ाुळगाव तालुक्यातील ७३ वर्षीय, मारेगाव तालुक्यातील ६७ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. मंगळवारी पॉझेटिव्ह आलेल्या ५११ जणांमध्ये ३०३ पुरुष आणि २०८ महिलांचा समावेश आहे. यवतमाळातील १७४, पुसद १६४, दिग्रस ३४, दारव्हा २८, पांढरकवडा १८, बा•ाुळगाव १७, उमरखेड १३, आर्णी १२, घाटंजी १२, वणी ९, महागाव ४, कळंब २, मारेगाव १ व इतर १ रुग्ण आहे. मंगळावारी एकूण २७३६ रिपोर्ट प्राप्त झाले असून, ५११ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १८०३ अ‍ॅक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला असून, नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!