आर्वी : येथील नगर पालिकामध्ये नगरपालिकेच्या दुटप्पी धोरणाचा निषेध करण्याकरीता प्रहारचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात ढोलताशा आंदोलन करण्यात आले.
आर्वी मधील काही धनदांडग्या लोकांनी राजकीय व्यक्तींना हाताशी धरून शासकीय जागी अतिक्रमण करून ती जागा हडपन्याचा डाव आखला आहे. रात्री लोक झोपल्यानंतर त्या जागेवर बांधकाम करीत आहे. एकीकडे गरीब सामान्य अपंग व्यक्तींचे अतिक्रमणाच्या नावावर दुकाने पडायची मोहीम राबवत असताना धनदांडग्यांना मात्र राजरोसपणे अतिक्रमणाला आणि बांधकामाला मुभा द्यायची हे नगर परिषद प्रशासनाचे दुटप्पी धोरण बरोबर नाही. त्यामुळे जोपर्यंत धनदांडग्यांनी केलेले अतिक्रमण हटत नाही. सर्वांना सारखा न्याय मिळत नाही तोपर्यंत प्रहार दररोज तहसील कार्यालय आणि नगर परिषद कार्यालय समोर ढोलताशा आंदोलन चालूच ठेवेल. असे प्रहारचे बाळा जगताप यांनी सांगितले.