मोबाईल: आरंभी येथे इसमाचा खून

दिग्रस (यवतमाळ): मोबाईल फोन करून त्रास देत असल्याच्या कारणावरून सेन्ट्रींगच्या लाकडाने मारहाण करून इसमाचा खून केला. दिग्रस तालुक्यातील आरंभी येथे सोमवारी १ मार्च रोजी रात्री घडली. दिग्रस पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.
रामेश्वर प्रेमसिंग पवार ( २८) रा.आरंभी असे मृतकाचे नाव आहे. तर गजानन राजाराम राठोड (४२) रा. आरंभी, दीपक राजाराम राठोड (४२) , माणिक राजाराम राठोड (३८) अशी आरोपींची नावे आहे. या घटनेत पुन्हा एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. मृतक रामेश्वर पवार हा गजानन राठोड याला मोबाइलवर नेहमी कॉल करून त्रास देत होता. सोमवारी १ मार्च रोजी सायंकाळी आरंभी येथील सार्वजनिक रस्तावर मृतक रामेश्वर व गजानन यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली. यावेळी रामेश्वर यांच्या डोक्यात सेन्ट्रीगचे लाकूड मारून जखमी केले. तसेच दीपक राठोड , माणिक राठोड व एका विधि संघर्षग्रस्त बालकाने रॉड व काठीने मारहाण केली. यामध्ये रामेश्वर पवारचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच दिग्रस पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदानासाठी ग्रामणि रुग्णालयात पाठविला. भारत बद्री पवार यानी दिलेल्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सोनाजी आम्ले, रवींद्र जगताप, नरेंद्र पुंड व ब्रह्मदेव टाले करीत आहे.