ग्रामीणब्रेकिंगमहाराष्ट्र

चमत्कार : अन् दोन वेळा मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत

महेंद्र देवतळे / घाटंजी (यवतमाळ)

माणूस एकदा काळाच्या पडद्याआड गेला की, पृथ्वीतलावरील त्याची गतीविधी थांबून जाते. एकदा माणसाचं मरण झालं की, तो नंतर कधीही कोणाच्या दृष्टिपथात येत नाही. आले तरीही •ाूत म्हणूनच. मात्र शहरातील रमेश फुसे आठवड्यातून दोनदा मरून सुद्धा आजमितीस जिवंत असल्याची चमत्कारीक घटना समोर आली आहे. शहरासह तालुक्या या घटनेची जोरदार चर्चा आहे.
रमेश फुसे, नगर परिषदेमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून आपल्या कार्याची ओळख घाटंजीकरांना करून देणारा एक प्रामाणिक स्वच्छता दूत. ‘आपण आणि आपलं काम •ालं’ या व्यतिरिक्त या माणसाला बाकी कोणत्याही बाबींमध्ये फारसं स्वारश्य नाही. कर्तव्यावर असताना कोणीही आवाज दिला, कोणतेही काम सांगितले तर ते निमूटपणे करून वाहवा मिळवणारा हा कर्मचारी. सदर कर्मचा-यांचा घाटंजीत दोन वेळा मृत्यू झाला असून, तो जिवंत सुद्धा झाला आहे. झाले असे की, मागील आठवड्यात फुसे नामक घाटंजीतील कोणीतरी व्यक्ती मरण पावला. त्याही वेळेस रमेश फुसे मरण पावल्याची चर्चा शहरात सर्वत्र होती. आजही सकाळी वर्दळीचा असणा-या वाघाडी नदीच्या पुलावर शहरातील कोणीतरी इसम पडून असल्याचे लक्षात आले. पाहण-यांनी ते पाहिले, मात्र त्यांचा कुठेतरी अंदाज चुकला. स्वच्छता कर्मचारी रमेश फुसे मरण पावल्याची बातमी पुन्हा एकदा शहरात व्हायरल झाली. मात्र प्रत्यक्षात जिवंत असलेल्या माणसाला दोनदा घाटंजीकरांनी अजाणतेपोटी मृत घोषित केले. रमेश फुसे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने वातार्लाप केला असता ही बाब निदर्शनास आली. रमेश फुशे यांनी ‘मी टकाटक व तंदुरुस्त असून या घटनेमुळे माझे आयुष्य वाढल्या’ ची प्रतिक्रिया व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!