ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय

पूजा चव्हाणच्या आजीचा वनवाडी ठाण्यासमोर ठिय्या

पुणे : पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार असा पवित्रा मृतक पूजाच्या आजीने घेतला आहे. आज रविवारी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या समवेशत पूजाची आजी शांताबाई राठोड यांनी वानवाडी पोलीस ठाणे गाठले. भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दोन दिवसापूर्वी पोलीस ठाण्यात धडक देवून पोलीस अधिका-याला जाब विचारला होता. यावेळी पोलीस अधिका-यांनी या प्रकरणात कोणाचीही तक्रार नसल्याने गुन्हा दाखल केला नाही असे स्पष्टीकरण दिले होते. त्यामुळे आज पूजा चव्हाण यांची चुलत आजी शांता राठोड, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी वानवडी पोलीस ठाणे गाठले. जो पर्यंत संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहील असा इशारा दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!