ब्रेकिंगराजकीय

का दिलांय वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा

मुंबई : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या तरुणीने पुणे येथील फ्लॅटमधील गॅलरीतून पडल्याने संशयास्पद मृत्यू झाला. पूजाच्या मृत्यूनंतर १२ व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणामध्ये वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे आले होते. विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या पदाधिकारी चित्रा वाघ यांनी राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ना. राठोड यांच्यावर कारवाई करा नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशन चालु देणार नाही असा इशाराही भाजपाने दिला होता. दरम्यान आज रविवारी दुपारी शिवसेना नेते संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या वनमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

 

निष्पक्ष चौकशी व्हावी-आ. राठोड
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी असल्याचे आ. राठोड यांनी सांगितले. मात्र विरोधीपक्षांनी अधिवेशन चालू न देण्याची भूमिका घेतल्यामुळे आपण वनमंत्री पदाचा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. परंतू, आपण आमदारकीचा राजीनामा दिला नाही असेही राठोड यांनी सांगितले. बंजारा समाजाची तरुणी पूजा चव्हाणचा मृत्यू झाला. मात्र अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी प्रसारमाध्यम, समाज माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. समाजाची, माझी वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. गेली तीस वर्ष मी केलेलं राजकीय आणि सामाजिक काम उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, ही मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!