ब्रेकिंगविदर्भ

जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपासून संचारबंदी, कोरोनाचा यवतमाळात हॉटस्पॉट , तिघांचा बळी

 

यवतमाळ : जिल्ह्यात सलग तिस-या दिवशीही कोरोनाचा उद्रेक झाला असून,तिघांचा बळी गेला आहे. पुन्हा नव्याने २४१ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहे. आज सर्वात जास्त ११३रुग्ण यवतमाळ तालुक्यात आढळले असून कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे.
मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील ६० वर्षीय व ८२ वर्षीय पुरुष तर मानोरा (जि.वाशिम) येथील ८१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या २४१ जणांमध्ये १४१ पुरुष आणि १००महिलांचा समावेश आहे. यवतमाळ येथील ११३ रुग्ण, दिग्रस येथील ४४, पुसद येथील ३८, घाटंजी येथील ९, नेर येथील ७, पांढरकवडा येथील ६, दारव्हा येथील ६, उमरखेड, वणी आणि झरी जामणी येथील प्रत्येकी ५, आर्णि, कळंब आणि महागाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. शुक्रवारी एकूण १३७४ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी २४१ जण नव्याने पॉझेटिव्ह आले. तर ११३३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात १४२७ अ‍ॅक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १७०९७ झाली आहे.

 

जिल्हाधिका-यांनी घेतला यंत्रणेचा आढावा
जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादु•ाार्वाला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी यंत्रणेचा आढावा घेऊन कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.

 

रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी
पॉझेटिव्ह आलेल्या रुग्णांचे हाय रिस्क आणि लो रिस्क संपर्कातील सर्वांचा शोध घेऊन त्यांच्या नमुन्यांची तपासणी करावी, अशा सुचना देऊन जिल्हाधिकारी म्हणाले, रोज किती जणांचे नमुने घेण्यात आले, तपासणीकरीता किती पाठविले आदींची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिका-यांनी देणे बंधनकारक आहे. •ाांबराजा येथे एकाच गावात मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्यामुळे संपकार्तील नागरिकांचा शोध आणि नमुने तपासणी त्वरीत करावी. जेणेकरून प्रादु•ाार्वाला आळा घालण्यास मदत होईल. रॅपीड अ‍ॅन्टीजन किट प्रत्येक तालुक्याला किती मिळाल्या होत्या. त्यापैकी किती उपयोगात आल्या, शिल्लक किती आदी माहिती रोज अपडेट करावी. तसेच अ‍ॅन्टीजन किटबाबत डाटा एन्ट्री किती बाकी आहे, त्याबाबतसुध्दा प्रशासनाला नियमित अवगत करावे अशा सुचनाही जिल्हाधिका-यांनी दिल्या आहे.

 

आजपासून संचारबंदी
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्•ााव झालेल्या शहरी व ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधात्मक उपाय योजना प्रीााविपणे अंमलबजावणी करण्याकरीता नियम लागु करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता पासून ते सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत जिल्ह्यात संपुर्ण संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. या कालावधीमध्ये सर्व दवाखाने, औषधी दुकाने, पेट्रोल पंप,गॅस वितरण इत्यादी अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. तसेच दुध विक्रेते व डेअरी सुरू राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!