विदर्भ

कोरोनाने इसमाचा मृत्यू, २१५ जण पॉझेटिव्ह


यवतमाळ : शहरातील एका इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला असून २१५ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये •ारती असलेल्या ५६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात पॉझेटिव्ह आलेल्या २१५ जणांमध्ये १२१ पुरुष आणि ९४ महिला आहेत. यात यवतमाळ येथील १०० रुग्ण, दारव्हा २८, पुसद २२, दिग्रस १७, पांढरकवडा १६, वणी १२, नेर १०, झरीजामणी ३, बा•ाुळगाव आणि उमरखेड प्रत्येकी २, आर्णि, राळेगाव आणि इतर ठिकाणचा प्रत्येकी १ रुग्ण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!