ब्रेकिंगराजकीयविदर्भ

स्वत:च सरण रचुन नवनिर्वाचित सदस्याची आत्महत्या

 

घाटंजी : तालुक्यातील सावरगाव मंगी येथे नवनिर्वाचित सदस्याचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना २२ फेबु्रवारी रोजी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान घडली. अशोक भाऊराव चौधरी (३६) असे मृतकाचे नाव आहे. सरपंच उपसरपंच निवडीच्या दिवशीच रात्रीला ही घटना घडल्याने घातपात की अपघात अशा चर्चेचा पेव फुठले आहे. तर दुसरीकडे स्वत:च सरण रचून आत्महत्या केल्याची तक्रार पारवा पोलीस ठाण्यात दिली आहे.
तालुक्यातील सावरगाव मंगी येथे २२ फेबु्रवारी रोजी गावातील सरपंच उपसरपंच निवडीची सभा होती. या सभेमध्ये नवनिर्वाचित सदस्य अशोक चौधरी यांनी मतदान सुद्धा केले. त्याच दिवशी सायंकाळी आठच्या सुमारास गावालगत असलेल्या शेतामध्ये दोन वर्षापासून पडून असलेल्या चिंचेच्या इंधनात आग लागल्याचे गावक-यांच्या लक्षात आले. शेतातील पिकाची हानी होऊ नये म्हणून सदर आग विझविण्यासाठी गावातील काही लोक गेले असता आगीच्या मध्यभागी कोणी तरी होरपळत असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच पारवा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक टाले, शिपाई मुंडे, वाघमारे यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. सदर शव बहुतांशी प्रमाणात भाजल्यागेल्याने योग्य निदानासाठी यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयाला पाठविण्यात आले. तेथे काही नातेवाईकांनी आक्षेप नोंदविल्या मुळे नागपूर येथे त्यांचे अवशेष शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे. नवनिर्वाचित सदस्याचे असे अकस्मात निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
चौकट
सरपच निवड सभेत केले मतदान
२२ फेबु्रवारी रोजी गावातील सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीसाठी स•ाा होती. यावेळी नवनिर्वाचित सदस्य अशोक चौधरी यांनी मतदान सुद्धा केले. असे असले तरी मतदान करतेवेळी त्यांची मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याचे, अर्थातच कोणत्यातरी दडपणाखाली असल्याचे काही लोकं खासगीत बोलून दाखवत आहे. त्यामुळे सदर घटना ही अपघात की घातपात या चचेर्ला उधाण आले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खरे कारण समोर येईल. मात्र सद्यस्थितीत फियार्दी वामन चौधरी यांनी पारवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चौधरी यांनी स्वत: सरण रचून आत्महत्या केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!