ग्रामीणराजकीय

बोरीच्या सरपंचपदी लक्ष्मण वांजरेकर यांची तर उपसरपंचपदी ओमप्रकाश लढ्ढा

 

बोरी अरब : दारव्हा तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत बोरी अरबच्या सरपंचपदी लक्ष्मण वांजरेकर यांची तर उपसरपंचपदी ओमप्रकाश लढ्ढा यांची अविरोध निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतवर •ााजपा प्रणित लढ्ढा गटाचे वर्चस्व असून, आ. मदन येरावार यांच्या प्रयत्नातून अनेक विकास कामे केली आहे. त्यामुळे यावर्षी घेण्यात आलेल्या निवडणुकीत १२ सदस्य विजयी झाले आहे. तर विरोधी गटाला दोन जागेवर समाधान मानावे लागले व अपक्ष असलेली एक महिला उमेदवार विजयी झाली.
दारव्हा तालुक्यातील बोरी अरब ही ग्रामपंचायतमध्ये १५ सदस्य आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आ. मदन येरावार यांच्या मार्गदर्शनात •ााजपा प्रणित लढ्ढा गटाने १५ उमेदवार उ•ो केले होते. या निवडणुकीत १२ उमेदवार विजयी झाले असून, लढ्ढा गटाला बहुमत मिळाले आहे. २४ फेबु्रवारी रोजी सरपंच, उपसरपंच पदाची निवड प्रक्रीया राबविण्यात आली. यामध्ये सरपंचपदी लक्ष्मण वांजरेकर यांची तर उपसरपंचपदी ओमप्रकाश लढ्ढा यांची अविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ममता लढढा ,बबलु जयसवाल ,शेख सोहेब ,अनिकेत बेलगमवार ,अमोल इंगळे ,प्रफुल खडसे ,आरती चव्हाण ,अनिता तिवारी ,वनिता निबर्ते ,मालाबाई गरड ,मालुताई गायकवाड़ ,शोभाबाई भगत उपस्थित होते. तर एक महिला सदस्य अनुपस्थित होती. माजी पालकमंत्री तथा आमदार मदन येरावार यांनी बोरी अरबच्या विकासासाठी निधी मिळवून दिला आहे. गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामामुळे बोरी अरबवासीयांनी नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत लढ्ढा यांच्या पॅनलच्या १२ उमेदवारांना पसंती देत विरोधकांचा धुव्वा उडविला. गावाच्या विकासासाठी आपण प्रयत्न राहणार असल्याचे मत माजी सरपंच तथा सदस्य बबलु जयस्वाल यांनी व्यक्त केले.
यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एम.व्ही. राउत यांनी काम पाहीले. तर सचिव डी.बी. गावंडे, तलाठी वीर यांनी मदत केली. यावेळी विनोद कावरे, शंकर चव्हाण, बब्बु•ाार्ई शेख, रामाजी तांगडे, सुनिल मालाणी, शंकर बोकडे, नागोराव •ागत, रणजित काकडे, नारायण खोपे, प्रकाश खंडारे, मनोहर गोमासे, राजू पंचारिया, संतोष पावडे, अजय रुंदे, विनोद तट्टे, नामदेव गरड, उमेश वानखडे, देविदास मडावी, आर. पाटील, सोनोने मामा, प्रदिप गोमासे, वसंत गायकवाड, प्र•ााकर लुटे, पपलु तिवारी, गुलाब शेख, योगेश गोमासे, वसीम शेख, गुड्डु जयस्वाल, राजू सैय्यद, गजानन तायडे, अकील शेख, जावेद खॉ पठाण, सलीम पठाण, नरेश कांबळे, सुनिल निंबर्ते, ज्ञानेश्वर तिजारे, उमेश जयस्वाल, किसन तिजारे, बबाराव निंबर्ते, नारायण खोपे,  श्याम गुप्ता उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!