आरोग्य व शिक्षणग्रामीण

रेल्वेचे चित्रीकरण ठरले आकर्षण

 

घाटंजी : पंचायत राज समितीने बुधवारी अचानक पांढुर्णा (बु.) जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. शिक्षकांची कार्यप्रणाली, शाळेची रंग रांगोटी शाळेचा परिसर पाहून समिती कडून समाधान व्यक्त करण्यात आले.

सर्व प्रथम पंचायत राज समितीने पांढुर्णा बु. जिल्हा परिषद शाळेला आकस्मित भेट देवून कार्यास सुरुवात केली. या शाळेत भेटी दरम्यान शाळेतील दर्शनी भाग रेल्वेची रेखाचित्र रेखाटल्याने ते आकर्षण ठरले. येथिल विद्यार्थ्यांनी स्वतः प्रोजेक्टर व संगणक हाताळले. एक ना अनेक बाबी मध्ये ही शाळा मान्यवरांना उत्कृष्ट वाटल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. तालुक्यातील सुरवातीलाच चांगले कार्य दिसल्याने तालुक्यात चांगलेच कार्य असावे असा कदाचित कयास त्यांच्या मते निर्माण झाला असावा यासाठी अधिकारी वर्गात आसेचा किरण निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. येथिल शाळेच्या उत्कृष्ट कार्यासाठी गट विकास अधिकारी माडकर, गट शिक्षण अधिकारी कांबळे, केंद्र प्रमुख बनसोड यांचे मार्गदर्शन लाभले. या शाळेवर प्रभारी मुख्याध्यापक विठ्ठल राठोड यांना रुजू होवून दोनच वर्ष झाले असले तरी आपल्या कल्पकतेतून शाळेचा कायापालट घडवून आणला. या शाळेच्या कायापालट कार्यात त्यांचे सहकारी विजय डंभारे, दत्ता ठाकरे, नरेंद्र पूनसे या शिक्षकांनी मोलाचे योगदान देत सहकार्य केले. या शाळेतील रेल्वे चे रांगोटीकरण आकर्षण ठरले असून समितीने समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!