आरोग्य व शिक्षण

पिआरसी समोर वाचला वसतिगृह कर्मचा-यांच्या समस्येचा पाढा,अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेचे निवेदन

 

घाटंजी : अनुदानित वसतिगृह व आश्रम शाळा ही योजना कार्यरत आहे. दोन्ही ठिकाणच्या वसतिगृहातील कर्मचारी २४ तास कार्यरत असतात शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा, वि.जा.भ.ज.,आदिवासींच्या आश्रम शाळा संलग्न वसतिगृहे, अनुदानित वस्तीगृह या सर्वांचे कार्य, त्यात शिकर्णाया मुलांचे वयोगट, वर्ग समान आहे. परंतु वेतनात प्रचंड तफावत असून, अनुदानित वसतिगृह कर्मचा-यांना तुटपुंज्या मानधन मिळत आहे. महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रदीप वाकपैजन यांनी सदर समस्यांचा पाढा पिआरसीसमोर वाचला. नियमित वेतनश्रेणी लागु करण्याची शिफारस करण्याची विनंती केली.
राज्यातील अनुदानित वसतिगृह ही शासनाची १९६० ची मूळ योजना आहे. आश्रम शाळा ही योजना १९७६ नंतर कार्यरत झालेली आहे. दोन्ही ठिकाणच्या वसतिगृहातील कर्मचारी २४ तास कार्यरत असतात. शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा, वि.जा.भ.ज.,आदिवासींच्या आश्रम शाळा संलग्न वसतिगृहे, अनुदानित वस्तीगृह या सर्वांचे कार्य, त्यात शिकणा-या मुलांचे वयोगट, वर्ग समान आहे. परंतु वेतनात प्रचंड तफावत आहे. दिनांक ९ एप्रिल २०१३ रोजी च्या मंत्रिमंडळ बैठकीत सदर कर्मचा-यांना नियमित वेतन श्रेणीत सामावून घेण्याचा प्रस्ताव सादर केला असून, प्रलंबितच आहे. त्यामुळे वेतनश्रेणी लागू करावी या मागणीसाठी प्रदीप वाकपैजण यांनी व्यक्तिशा व संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने केली. विशेष म्हणजे नुकतेच जानेवारी महिन्यात इगतपुरी येथून पायदळ मोर्चा काढून त्यांनी शासनाचे लक्ष वेधून घेतले होते. या आंदोलनाची दखल घेऊन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी समान काम समान दाम या धोरणानुसार वेतन श्रेणी लागू करण्यात येईल असे सांगितले. मात्र याबाबतीत अद्यापही कोणता निर्णय झालेला नाही.

 

अधिक्षकांना ९२०० रुपये मानधन

सद्यस्थितीत अधीक्षक यांना ९२००, स्वयंपाकी ६९०० व मदतनीस आणि चौकीदार यांना ५७५० इतके तुटपुंजे मानधन मिळत आहे. यामध्ये कुटुंबाचा महिन्याचा उदरनिर्वाह योग्य पद्धतीने होऊ शकत नाही. त्यामुळे विद्यमान समितीने निवेदनाची दखल घेऊन वेतनश्रेणीसाठी प्रयत्न करावे. वेतनश्रेणी बरोबरच शालेय शिक्षण वि•ाागाची नियमावली व सुविधा अनुदानित वस्तीगृहाला लागू आहे किंवा कसे? याबाबत शहानिशा करण्यात यावी, यवतमाळ जिल्ह्यातील अनुदानित वसतिगृह कर्मचा-यांना दरमहा विनाविलंब मानधन देण्यात यावे अशी मागणी पिआरसीकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!