क्राईम न्यूजग्रामीण
जिरा येथे शेतकरी आत्महत्या

पाढरकवडा : तालुक्यातील जिरा येथील शेतकरी मगलुलाल हरी आडे (७०)यांनी स्वतः च्या शेतामध्ये विषारी औषध प्राशन करून आयुष्य संपविले. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. मृतकाच्या मागे पत्नी तीन मुले, सुना, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे.