ट्रक चालकाचे अपहरण, चार आरोपींना अटक

वणी (यवतमाळ) : साईट न दिल्याच्या कारणावरून ट्रक चालकाचे अपहरण केल्याची घटना राजुर येथे घडली. याप्रकरणी वणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.
नॅशनल लॉरी सप्लायर या कंपनीत बालाजी लहू पापलवार रा. माळेगाव ता. लोहा जि.नांदेड हा ट्रक चालक म्हणून काम करतो. वणी वरून दगडी कोळसा •ारून सोलापूर ,कोल्हापूर येथे जातो. नेहमीप्रमाणे कंपनीचा एम.एच. २६ बी ४६४९ क्रमांकाचा ट्रक रोडवर उ•ाा केला होता. त्यानंतर ण्म.एच. ३१ / ७७८८ क्रमांकाच्या ट्रक समोर लावुन चार युवक उतरले. कारला साईट का दिली नाही म्हणून मारहाण केली व समोरील काच फोडून ट्रकचालकास गाडीत बसवून घेऊन गेले. नॅशनल लोरी सप्लायर चे एजन्सी यांना दहा हजाराची मागणी केली. पैसे दिले नाही तर ट्रक चालकास सोडणार नाही असा दम दिला. ट्रकचालकला सोबत घेऊन राजुर कॉलनी कडे गेले. या प्रकरणी एजंट वसीम खान यांनी वणी पोलिसांना माहिती दिली. यावरुन घटनास्थळी तात्काळ पोलीस पोहोचून ट्रक चालकाची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मनोज मोती कश्यप, सन्नी दीपक राजनलवार, क्रिष्ण विनोद सिंग, हरिकेश यादव सर्व रा.राजुर कॉलरी यास अटक केली.