राजकीयविदर्भ

ना.जयंत पाटील यांची हरीश चव्हाण यांच्यावर कौतुकाची थाप

यवतमाळ :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिवार संवाद यात्रेच्या अनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विमुक्त जाती •ाटक्या जमाती सेलच्या जिल्ह्यातील •ाक्कम बांधणीची विशेष दखल घेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांनी सदर सेलचे जिल्हाध्यक्ष हरीश चव्हाण यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
राष्टÑवादी कॉंग्रेसचे धोरण व जनहितवादी पक्षकार्याचा प्रसार तथा प्रचार करुन शेवटच्या माणसापर्यंत पक्ष पोहोचविण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसद्वारे संपूर्ण महाराष्ट्र•ार राष्ट्रवादी परीवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.त्याचाच एक •ााग म्हणून समर्थ लॉन यवतमाळ येथे ५ फेब्रुवारीला पक्षाध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आ. इंद्रनील नाईक, माजी आ. संदीप बाजोरिया, माजी आ. ख्वाजा बेग, राज्य सरचिटणीस वसंत घुईखेडकर, नाना गाडबैले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष क्रांती धोटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेण्यासह पक्षातील पदाधिका-यांनी पक्ष वाढीच्या दृष्टीने केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित विमुक्त जाती •ाटक्या जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष हरीश चव्हाण यांनी पद•ाार हाती घेतल्यानंतर केवळ एक वर्षाच्या अल्पावधीतच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात •ाक्कम बांधणी केले. ना.पाटील यांनी यवतमाळ येथे मंचावरच सर्वांसमक्ष जिल्हाध्यक्ष हरीश चव्हाण यांना जवळ घेत त्यांच्या कायार्बाबत गौरवोद्गार काढले असून, तुम्ही ख-या अर्थाने सत्कारास पात्र आहात असे म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विमुक्त जाती •ाटक्या जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष हरीश चव्हाण हे उच्चविद्या वि•ाूषित नेतृत्व असून ते दारव्हा तालुक्यातील चिखली •ाांडेगावं येथील निवासी आहेत.गरीब परिवारात झालेला जन्म आणि बालपणापासूनच गोरगरीब जनतेच्या सेवेची त्यांना आवड असल्याने आजवर ते लोकसेवेची कामे अविरतपणे करीत आलेले आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वि.जा.•ा.ज.सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांनी हरीश चव्हाण यांची यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्या जबाबदारीला शतप्रतिशत पार पाडत चव्हाण यांनी सदर सेलचे जाळे जिल्ह्यामध्ये बळकट केले आहे. कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात पक्षाच्या वतीने राबविण्यात आलेल्या राष्ट्रवादी पक्ष अ•िाप्राय अ•िायानामध्ये चव्हाण यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्हा वि.जा.•ा.ज.सेलने लक्षणीय अ•िाप्राय नोंदणी दर्शविल्याने त्यांच्या पक्षीय योगदानाचा व कार्याचा ना. पाटील यांनी प्रसंगी सन्मान केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!