क्राईम न्यूजब्रेकिंगविदर्भ

बेपत्ता युवकाचा आढळला मृतदेह

 दिग्रस : तालुक्यातील फुलवाडी येथील एका ३५ वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची तक्रार दिग्रस पोलिसात होती. परंतु तीन दिवसानंतर फुलवाडी शेत शिवारात अरुणावती प्रकल्पाजवळ ११ फेब्रुवारी २०२१ दुपारी ३.३० वाजता मृतदेह आढळला.
प्रदीप हरिचंद्र राठोड (३५) रा.फुलवाडी असे मृतकाचे नाव आहे. तो मंगळवारपासून बेपत्ता होता. त्यांच्या नातेवाईकांनी दिग्रस पोलिसात दि.९ फेब्रुवारी २०२१ रोजी याबाबत तक्रार दाखल केली होती. तीन दिवसांपासून त्याचा सर्वत्र शोधाशोध सुरू असताना ११ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी ३.३० वाजता त्याचा मृतदेह अरुणावती प्रकल्पाजवळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्या ठिकाणी विषारी औषधी खाली डब्बा ,विळा व बाजूला फॅशन प्रो दुचाकी उभ्या अवस्थेत होती. या प्रकरणाची माहिती दिग्रस पोलिसांना मिळाली तेव्हा तात्काळ दिग्रस पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, उपनिरीक्षक विजय राठोड व बाबाराव जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मृतकाच्या पश्चात आई-वडील,पत्नी एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!