ब्रेकिंगविदर्भ

वाघाचा दोन शेतक-यांवर हल्ला

झरी: तालुक्यातील जुणोनी शिवारात वाघाने दोन शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. जखमी शेतक-यावर पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
११ फेब्रुवारीला रात्री दोन्ही शेतकरी शेतात हरबरा असल्याने जागली करीता गेले होते. शेतात दडून असलेल्या वाघाने अचानक हल्ला चढविला. परंतु आरडाओरडा केल्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांचे जीव वाचले. तालुक्यातील मांडवी येथील शेतकरी इंद्रदेव गंगाराम कीनाके (२९) यांची शेती जुणोनी शिवारात आहे. इंद्रदेव याने आपला नातेवाईक दिनेश बापूराव मडावी (२२) रा. धारणा (वाई) याच्या सोबत घेऊन शेतात घेऊन जागली करीता गेला. सकाळी ७ वाजता दरम्यान वाघाने दोघांवर हल्ला चढविला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांवरील वाघाचा हल्ला आजू बाजूच्या शेतकऱ्यांना दिसताच सर्वांनी आरडाओरड केली. त्यामुळे वाघ शेतातून पळून गेला. त्यानंतर जख्मी शेतकऱ्यांना गावाकडे आणले व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले. वनविभागाच्या चारचाकीत जखमींना पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

५ वाघांचा संचार
जुणोनी परिसरात ५ वाघांचा मुक्त संचार आहे. ज्यामुळे वनविभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांच्या देखरेखीखाली शेतकरी शेतात काम करीत आहे. वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी शेतमजूर शेतात जाण्यास घाबरत आहे. आजच्या वाघाच्या हल्याने शेतकऱ्यांत पुन्हा दहशत वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!