क्राईम न्यूजब्रेकिंगविदर्भ

सराफा दुकानातून १७ लाखांच्या सोन्याचे दागिणे लंपास

बा•ाुळगाव : येथील सराफा व्यावसायिक विजय सुरेश वर्मा यांच्या दुकानातून सोन्या-चांदीचा माल व रोख रक्कम असा १७ लाख रुपयाचा मुद्देमाल ठेवून असलेली बॅग चोरट्याने लंपास केली. ही घटना आज गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक दिलीप पाटील •ाुजबळ, उपवि•ाागिय पोलिस अधिकारी माधुरी बाविसकर, स्थानिक गुन्हे शाखा पथक घटनास्थळी दाखल झाले.
विजय वर्मा यांचे विजय ज्वेलर्स नामक दुकान आहे. आज समाळी १०.३० वाजताच्या सुमारास ते दुकानात आले होते. त्यांनी दुकानाचे शटर उघडून सोबत असलेली काळ्या रंगाची बॅग दुकानाच्या काऊंटर मागे खुर्चीमध्ये ठेवली. दुकानाची साफसफाई करण्यात व्यस्त झाले. दरम्यान ते दुकानाच्या बाहेर असलेला कचरा साफ करीत असताना त्यांच्या हालचालीवर नजर ठेवुन असलेला एक युवक दुकानात शिरला. काही क्षणातच खुर्चीमध्ये ठेवलेली बॅग घेवुन तेथून पळ काढला. विजय वर्मा दुकानात परत आल्यावर त्यांना बॅग दिसली नाही. त्यांनी सीसीटीव्ही फुजेच पाहिले असता, एक युवक बॅग घेवुन दुकानातून बाहेर जावून पल्सर वाहनावर असलेल्या दुचाकी स्वाराच्या वाहनावर बसुन पसार झाल्याचे समोर आले. या घटनेची माहिती बा•ाुळगाव पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील •ाुजबळ, उपवि•ाागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने घटनास्थळ गाठून पाहणी केली. विजय वर्मा यांनी दिलेल्या फियार्दीनुसार बॅगमध्ये ३०० ग्राम सोन्याचे दागिणे किंमत अंदाजे १२लाख, २०० गॅ्रम चांदी किंमत अंदाजे १४हजार व रोख रक्कम ५ लाख रुपये असा एकुण १७ लाख १४ हजार रुपयाचा मुद्देमाल होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!