आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

कोरोनाने युवकाचा मृत्यू

यवतमाळ : गत २४ तासात जिल्ह्यात एका युवकाचा मृत्य झाला. ५१ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये घाटंजी तालुक्यातील ३१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ६६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण ३८८ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ५१ जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर ३३७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४७० ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 14947 झाली आहे. 24 तासात 66 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14040 आहे. तर जिल्ह्यात एकूण 437 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 146698 नमुने पाठविले असून यापैकी 146262 प्राप्त तर 436 अप्राप्त आहेत. तसेच 131315 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!