क्राईम न्यूजब्रेकिंगविदर्भ

जि.एस.आईल मिल कंपनीत ११ कोटीचे साहित्य लंपास, चोरट्यास अटक

वणी : येथिल जि.एस.आईल मिल कंपनीतुन तब्बल ११ करोड २३ लाख ९९ हजार रुपयाचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते. या प्रकरणी एक वर्षापूर्वी सिकंदराबाद येथिल स्टेट बँक आफ इंडीयाच्या शाखा व्यवस्थापकांनी वणी पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दाखल केली होती. दरम्यान आज आरोपीला अटक करण्यात आली.
मनोजकुमार अग्रवाल उर्फ मखरीया हे मँनेजिंग डायरेक्टर असलेल्या जि.एस.आईल मिल कंपनीत संजयकुमार अग्रवाल उर्फ मखरीया,अजयकुमार अग्रवाल उर्फ मखरीया व उमेशकुमार अग्रवाल उर्फ मखरीया ईत्यादी संचालक होते. कंपनी सुरु करतांना या संचालकांनी आदिलाबाद येथिल स्टेट बँक आँफ इंडीया या शाखेतुन २२० कोटी ९५ लाख रुपये कर्जाची उचल केली होती.परंतु ११ जुलै २०१२ पासुन या कंपनीच्या व्यवस्थापक मंडळाने नियमीत कर्जाची फेड न केल्याने जि.एस.आईल मिलचे खाते एनपिए झाले. परिणामी बँकेने आदिलाबाद व वणी येथिल कंपन्या आपल्या ताब्यात घेतल्या. यानंतर जुन २०१७ मध्ये सदर प्रकरण बँकेच्या सिकंदराबाद शाखेत गेल्यानंतर वणी येथिल जि.एस.आईल मिल मध्ये तैनात असलेले सुरक्षा रक्षक काढुन घेतले. वणी परिसरातील भंगार चोरट्यांनी या कंपनीला टार्गेट केले होते. विशेष म्हणजे चोरट्यांनी मशिनचा वापर करुन दिवसा ढवळ्या या कंपनीतील साहित्यांच्या चोरीचा धुमाकुळ घातला होता. या दरम्यान ९ फेब्रुवारी २०१७ ते १० मार्च २०१८ पर्यंत या कंपनीलील सुमारे ११ कोटी २३ लाख ९९ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. या घटनेची माहीती बँकेचे संचालक मनोज मखरिया यांना मिळताच त्यांनी बँकेत जावुन कंपनीतील साहित्यांची चोरी होत असल्याची माहीती दिली होती. दि.2 जानेवारी गुरुवारला सिकंदराबाद येथिल स्टेट बँक आँफ इंडीयाचे व्यवस्थापक राधाक्रुष्ण मुक्कटीश्वरराव संका यांनी वणी पोलीस ठाणे गाठुन साहित्य चोरी प्रकरणी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन वणी पोलीसांनी चोरीचा गुन्हा नोंद केला होता. दरम्यान आज या प्रकरणामध्ये मुख्य सुत्रधार शेख ईफ्तेखार उर्फ बबलु शेख अहमद(49) याला अटक केली असून पाच दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सदर कार्यवाही ही पोलिस अधिक्षक डाॅ.दिलीप पाटील भुजबळ , अप्पर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वैभव जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोऊपनि गोपाल जाधव, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दिपक वांड्रसवार यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!