क्राईम न्यूजब्रेकिंग

सेवानिवृत्त शिक्षकाची ५८ लाखाने फसवणुक


वणी : कोल इडीया सोसायटी लि. मध्ये गुंतवणुक केली तर १४ टक्के व्याजदर मिळते असे आमिष गणेशपुर येथील सेवानिवृत्त शिक्षकाला देण्यात आले. त्याच्याकडून ५८ लाख रुपये घेवून बनावट पावत्या देवून फसवणुक केल्याचा प्रकार उजेडात आला. या प्रकरणातील आरोपी फरार झाला असून, वणी पोलिस त्याच्या मागावर आहे.
गणेशपूर येथील सेवानिवृत्त शिक्षक आंनदराव हरबाजी बोढाले (६५) यांनी दोन कोटी रुपयाची शेती विकली. त्यांनी दोन मुलींना त्याचा हिसा देऊन २० लाख रुपये जवळ ठेवले होते. ते दररोज धार्मिक विधी साठी प्रगती नगर येथील एका धार्मिक संस्थानमध्ये जात होते. दरम्यान त्याची ओळख तीथे येणा-या कन्हैया कुमार देवनारायण राम रा. नेगुरसराई जि. चंदेरी उत्तरप्रदेश ह.मु. मेघदूत कॉलनी यांच्यासोबत झाली. त्यामुळे कन्हैयाचे त्यांच्या घरी ये-जा सुरू होती. शिक्षकाकडे शेती विकून पैसे जमा आहे याची माहिती त्याला मिळाली होती. बोढाले यांना सल्ला देऊन कोल इडीया सोसायटी लि चंद्रपुर, नागपूर , वणी मध्ये गुतवणुक केली तर १४ टक्के व्याजदर मिळते अशी आमिष दाखविले. प्रथम १२ जुलै २०१९ रोजी त्याकडे ८ लाख रुपये दिले. त्यानंतर अनेक वेळा एकुण ५८ लाख रुपये नेवून पावत्या दिल्या आहे. सदर पावत्या इतरत्र दाखवून शहाणीशा केली असता संशय आल्याने बोढाले यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. यावेळी कन्हैया याने १० दिवस वेळ मागितला असा उडवाउडविचे उत्तर देत होता. अशातच मेघदूत कॉलनी मधून त्याने पोबारा करुन आपल्या गावी परत गेला. त्यामुळे बोढाले यांनी कन्हैयाच्या घरी संपर्क साधला असता लॉकडाऊन संपताच तो परत येईल असे त्याच्या भावाने सांगितले होते. आता संपर्क साधला तर भ्रमणध्वनी बंद येत असून, आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच मंगळवारी वणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी कन्हैयाकुमार देवनारायण राम याच्याविरुद्ध भादंवी कलम ४०६,४२०,४६८,४७१ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास उप विभागीयपोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!