विदर्भ

जिल्ह्यात दोघांचा मृत्यू, ५४ जण पॉझेटिव्ह

यवतमाळ : कोरोनाने जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५४ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकांमध्ये कळंब तालुक्यातील ७५ वर्षीय पुरुष तर दारव्हा तालुक्यातील ६७ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये •ारती असलेल्या ३३ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य वि•ाागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण ५२७ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ५४ जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर ४७३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४८६ अ‍ॅक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १४८९६ झाली आहे. २४ तासात ३३ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १३९७४ आहे. तर जिल्ह्यात एकूण ४३६ मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत १४६२६४ नमुने पाठविले आहे. यापैकी १४५८७४ प्राप्त तर ३९० अप्राप्त आहेत. तसेच १३०९७८ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य वि•ाागाने कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!