ब्रेकिंग

अपघातात एक जण ठार

महागाव : •ारधाव वाहनाला अपघात झाल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना आज बुधवारी धनोडा पुलाजवळ घडली. अजय संजय आडे रा. केनद असे मृतकाचे नाव आहे. तर विरेंद्र राठोड असे जखमीचे नाव आहे. एम.एच.०३ ए आर २४२७ क्रमांकाचे वाहन यवतमाळवरुन आपल्या गावाकडे जात होते. अशात एका वाहनाला आॅव्हरटेक करीत असताना धनोडा उडान पुलाजवळ नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होवून शेतात गेले. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, एक जण जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग मदत केंद्र धनोडाचे वाहतुक अधिकारी प्रेमदास आडे यांनी घटनास्थळ गाठले. जखमीला माहुर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नांदेड येथे हलविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!