क्राईम न्यूज

ग्रामसेवकांचा संशयास्पद मृतदेह आढळला

 

वणी : वरोरा येथील ग्रामसेवकाचा वणी-कायर मार्गावरील वनकर यांचे शेताजवळील पुलाच्या खाली संशयास्पद मृत्यूदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुहास बापुजी झाडे (४९)रा.शिवाजी वार्ड लांबट सर हाऊस जवळ वरोरा, असे मृतकाचे नाव आहे. सुहास झाडे हे ग्रामसेवक असुन आपटी दांडगाव ग्रामपंचायतीचे कामकाज सांभाळत असलेल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळताच ठाणेदार वैभव जाधव,सपोनि माया चाटसे , पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. ग्रामसेवकाच्या मृत्युचे खरे कारण पोलिस तपासात निष्पन्न होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!