वणीत अवैध देशी दारू जप्त, दोघांना अटक

यवतमाळ : अवैध देशी दारूचा पुरवठा करण्यासाठी घेवून जाणारे दोन वाहन जप्त केले असून, दोन जणांना अटक केली. वणी पोलिस ठाण्यातील डी. बी. पथकाने ही कारवाई केली.
धनेश्वर भवानीशंकर जाशी (५२) रा. मोर्य नगर चिखलगांव वणी, कुंदन कोकाजी चव्हाण (२७) रा. शारदा सॉ. मिल मागे शास्त्रीनगर वणी अशी आरोपींची नावे आहे. २ फेबु्रवार रोजी मोर्य ले आउटठ चिखलगाव वणी येथे धनेश्वर जोशी याच्या घराजवळ एम.एच. ४ डी वाय ५१९५ व एम.एच ३४ ए ए ६९५४ क्रमांकाच्या दोन वाहनामध्ये देशी दारुच्या पेट्याभरत असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे वणी पोलीस ठाण्यातील डी. बी. पथकाने धाड टाकुन दोन कार, मोटर सायकल, मोबाईल व अन्य साहित्य किंमत ६ लाख ८३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार, ठाणेदार वैभव जाधव, डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दिप वांड्रस्वार यांनी केली.