ब्रेकिंगविदर्भ

उमरी सर्कल मध्ये आढळला जखमी बिबट्या

 

पांढरकवडा  (यवतमाळ):  पांढरकवडा वनपरिक्षेत्र अंतर्गत उमरी वर्तुळातील किन्हाळा बीट मधील वाठोडा शिवरात एक वर्ष वयाचा बिबट्या जखमी अवस्थेत आढळले. त्याला रेस्क्यू टीमने ताब्यात घेऊन येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात आणले आहे. वरिष्ठ वनअधिका-यांच्या आदेशानंतर बिबट्याला नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे.
पांढरकवडा वनपरिक्षेत्रच्या उमरी वनवतुर्ळात अवैध शिकारीच्या घटना नेहमीच घडत असतात. रानडुकराच्या शिकारीचे प्रकरणात तीन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते. उमरी सर्कलमधील किन्हाळा या बीट मधील वाठोडा, जीरा मीरा, सखी, घोडदोडा , या जंगल परिसरात मोर, हरीण, ससा, रोहि, या प्राण्यांच्या शिकार होत असल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान आज जखमी असलेल्या बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आला असून, एका पायाला जखम आहे. हा प्रकार उघडकीस येताच बिबट्याला रेस्क्यू टीमने ताब्यात घेऊन प्रथम उपचार करण्यात आले. सध्या बिबट्याचा बच्छडा वनपरिक्षेत्र कार्यालय पांढरकवडा येथे ठेवण्यात आला आहे. वरिष्ठांच्या पुढील आदेशानंतर नागपूर येथे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संगीता कोकणे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!