ब्रेकिंगविदर्भ

मारेगाव तालुक्यात शेकडो कोंबड्याचा मृत्यू

 

मारेगाव : शहरासह मार्डी, कुंभा, नवरगाव येथे शेकडो कोंबड्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे व्यवसायीकावर आर्थिक संकट कोसळले आहे. कोंबड्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे. यापूर्वी आर्णी येथे मोरांचा तर सावरगाव येथे कोंबड्याचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

मारेगाव शहरासह मार्डी, कुंभा,नवरगाव, येथे कोबड्याचे मार्केट जोरात सुरू आहे. या बाजारात ग्रामीण भागातील नागरीक कोंबड्या खरेदीसाठी येतात. मात्र गेल्या काही दिवसापासून या व्यवसायावर संकट कोसळले आहे. शेकडो कोंबड्याचा दररोज मृत्यूमुखी पडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोंबडी खाण्याकडे पाठ फिरवली आहे. त्याऐवजी मटन किंवा मच्छी खरेदी कडे ग्राहकांचा कल दिसुन येत आहे. बर्ड फल्यूच्या भितीमुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कमी ग्राहक कोंबड बाजारात खरेदीसाठी दिसुन येत आहे. मात्र मटण व मच्छी खाण्याकडे कल वाढला आहे. बर्डफ्लुच्या भीतीने ग्राहक कोबडी खाण्याऐवजी ईतर मासाहाराकडे वळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मारेगाव शहरात दर मंगळवारला आठवडी बाजार भरतो. बुधवारला मार्डी, गुरुवारला नवरगाव तर रविवारला कुंभा येथे आठवडी बाजार भरतो. या बाजारात ईतर वस्तुच्या खरेदी सोबत मांस विक्रिच्या व्यवसायाला मोठी मागणी आहे.मात्र गेल्या काही दिवसापासून तालुक्यात कोंबड्यावर अज्ञात आजाराने थैमान घातले असल्याने शेकडो कोंबडी दरदिवशी मरताना दिसून येत आहे.त्यामुळे ग्राहक कोबड्याचे मास खाण्या ऐवजी ईतर मासावर ताव मारण्याकडे वळल्याचे पाहवयास मीळत आहे. कोंबड्याची टेस्ट करण्यात येवुन ग्राहकांमध्ये जनजागृती व्हावी अशी मागणी आता परीसरात जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!