ब्रेकिंग

कोरानाने इसमाचा मृत्यू; 29 जण पॉझेटिव्ह


यवतमाळ : कोरोनाने नेर शहरातील 61 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात 29 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 41 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आज एकूण 377 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 29 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 348 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 466 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 14539 झाली आहे. 24 तासात 41 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 13645 आहे. तर जिल्ह्यात एकूण 428 मृत्युची नोंद आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!