
ढाणकी : येथील नगरपंचायतच्या विषय समिती सभापती पदाला एक वर्ष पुर्ण झाले आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशाने आज मंगळवारी नवीन विषय समितीच्या सभापतीची निवड करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, बहुजन वंचित आघाडी आदी पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केली होती. दरम्यान आजच्या सभेत सभापती पदाच्या निवडीवरून नगरसेवकांमध्ये तु तु मै मै झाली. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. त्यामुळे आज होणारी निवड प्रक्रीया झाली नसून, पुढील आदेशानंतर करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने १ फेबु्रवारी रोजी नगरपंचायत ढाणकीच्या सभागृहात विषय समिती सभापतीची निवड करण्याचे आदेश ढाणकी नगर पंचायत देण्यात आले होते. त्यावरून आयोजीत सभेत पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी कामकाज पाहिले. मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांनी सहकार्य केले. सोमवारी नामनिर्देशनपत्र भरण्याची वेळ ३ वाजेपर्यंत होती. परंतु दिलेल्या वेळेमध्ये कोणत्याही नगरपंचायत सदस्याने अर्ज दाखल न केल्यामुळे ढाणकी नगरपंचायत च्या सभापतिपद रिक्त ठेवण्यात आले. या बाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याडे सादर करून पुढील तारीख निश्चित करण्यात येईलअसे स्वप्नील कापडणीस यांनी सांगितले.
ढाणकी नगर पंचायत मागील वर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित आघाडी आणि अपक्ष नगरसेवकांनी मिळून आघाडी स्थापन करून उपाध्यक्ष सह पाचही विशेष समितीच्या सभापतीपदी पक्षाचे नगरसेवक बसविले होते. परंतु या वर्षी ठरल्याप्रमाणे विषय समिती सभापतीपदी तडजोड करताना पक्षश्रेष्ठी ला कठीण जात होते. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना, वंचित आघाडी, राष्ट्रवादी पक्षाने बैठक घेतली. यामध्ये नगरसेवकात तु तु मै मैं झाल्याने कार्यकर्त्यांनी रडा केल. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या राड्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आपण लिहिलेले गटनेत्याचे पत्र तसेच ठेवत पीठासीन अधिका-यानी दिलेल्या वेळेमध्ये कोणत्याही नगरसेवकाकडून नामांकन दाखल करण्यात येणार नाही असे सांगितले. त्यामुळे कोणत्याही नगरसेवकांनी सभापती पदाकरिता नामांकन दाखल केले नाही. त्यामुळे नगरपंचायतच्या सभापती निवड कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.