महिलांनी उद्योजक बनाव – अरविंद तायडे

यवतमाळ : महिलांनी आपल्या कलेचा वापर करून स्वत: उद्योजक व व्यावसायिक बनावे. व्यवसायाचा माध्यमातून बचत करावी आणि आरोग्याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को. आॅप सोसायटीचे अध्यक्ष अरविंद तायडे यांनी केले.
राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को. आॅप सोसायटी आणि आरोहीइन्फो एफ आय मॅनेजमेंट लि.च्या वतीने आयोजीत हळदी कुंकवाच् या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरोहीइन्फोचे व्यवसाय व्यवस्थापक संजय डोंगरे, पंकज मेहेकर, जयश्री पांडे उपस्थिस होते. या कार्यक्रमाचे संचालन पल्लवी शेडाम यांनी केले.यावेळी संजय डोंगरे म्हणाले की, बचत गटातील महिलांनी आपल्या उत्पन्नतील काही हिस्सा हा बचतीच्या माध्यमातून जमा करावा. भविष्यात तीच बचत आपला आधार बनणार असून, त्या माध्यमातून भविष्यात मदत होईल. कार्यक्रमासाठी सदानंद गरड, कपील वडपत्रे, विक्रम चोपडे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी मंदा लभाने, श्रद्धा भानारकर,पंकज, चेतन धवणे, पल्लवी शेडाम, कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.