ब्रेकिंग

बालकांना सॅनिटायझरचा पाजल्या प्रकरणी तीन कर्मचारी बडतर्फ, दोन वैद्यकीय अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस

 

यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणा-या कापसी (कोपरा) येथे पोलिओ लसीकरणा दरम्यान १२ बालकांना पोलिओचा डोस म्हणून सॅनिटायझर पाजल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी या केंद्रावरील आरोग्य अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या तिघांनाही बडतर्फ करण्यात आले. तर दोन वैद्यकीय अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या संदर्भातील आदेश दिले.
भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणा-या कापसी कोपरा येथील पल्स पोलीओ बुथवर १२ बालकांना पोलिओ ऐवजी सॅनिटायझर पाजण्यात आले होते. त्यामुळे बालकांना त्रास होण्यास सुरूवात झाल्याने सर्व बालकांना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आरोग्य अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना सेवेतून बडतर्फे करण्यात आले. तर दोन वैद्यकीय अधिका-यांना कारणे दाख वा नोटीस बजावली आहे.

 

दोन सदस्यीय समिती गठीत
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी डॉ. ढोले आणि डॉ. पी. एस. चव्हाण अशी दोन सदस्यीय समिती नेमली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मसराम, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मनवर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तर सीएचओ डॉ. अमोल गावंडे, आशावर्कर संगीता मसराम, अंगणवाडी सेविका सविता पुसनाके यांची सेवा समाप्ती कारवाई आली आहे. चौकशी अहवाल लवकरच येणार असून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

 

झेड पी अध्यक्ष, आरोग्य सभापतींनी घेतली भेट
आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कलिंदा पवार आणि आरोग्य सभापती श्रीधर मोहोड यांनी बालकांची भेट घेतली. पोलिओ समजून सॅनिटायझर पाजणे हे हलगर्जीपणाचा कळस आहे. तीन कर्मचा-यांना बडतर्फ करण्यात आले आहे. दोन वैद्यकीय अधिकारी यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. अहवाल येताच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच मुलांना सॅनिटायझर पाजण्यात आल्याची माहिती मिळताच तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेतली आणि यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाईचे निर्देश दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!