ब्रेकिंगविदर्भ

धक्कादायक : बालकांना दिला सॅनिटायझरचा डोज

 

भांबोरा येथील पोलिओ केंद्रावरील प्रकार

यवतमाळ : जिल्ह्यात काल रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील आरोग्य केंद्राच्या पोलिओ बुथवर तब्बल १२ बालकांना पोलिओच्या डोज न देता त्यांना चक्क सॅनिटायझरचा डोज दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आला. भांबोरा येथील रुग्णालयातील पोलिओच्या बुथवर पल्स पोलिओे मोहीमेला सुरुवात झाली. यावेळी बालकांना पोलिओचा डोज न देता त्यांना सॅनिटायझरचा डोज दिला. त्यानंतर बालकांना त्रास सुरू झाला. हा प्रकार उघडकीस येताच त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या गंभीर प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!