वाघाचा रस्ता अडविने भोवले; जिप्सी चालकांसह गाईड निलंबीत

यवतमाळ : पांढरकवडा येथील टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पर्यटकांना जिप्सीतून फिरवत असतांना वाघाचा रस्ता अडविल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) सुभाष पुराणिक यांनी तीन जिप्सी चालक, गाईड चालकांना निलंबित केले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आले होते. त्या काळात पर्यटन स्थळावर पर्यटकांना प्रवेश बंद होता. दरम्यान गत महिन्यापासून लॉकडाउनमधील नियमाला शिथीलता दिली आहे. त्यामुळे पर्यटन स्थळे सुरू झाली असून, दहा महिन्यानंतर पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. २८ जानेवारी रोजी तीन जिप्सींनी पर्यटकांसोबत टिपेश्वर अभयारण्यात प्रवेश केला होता. अशातच पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले. यावेळी जिप्सी चालकाने आपले वाहन ५० मीटर अंतराची मर्यादा ओलांडून बाजुच्या लंगलात वाहन नेवून वाघाचा रस्ता अडविला. या बाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, या गंभीर प्रकाराची दखल घेवून तीन जिप्सीचालक, गाईडला निलंबित करण्यात आले.