
यवतमाळ : गॅस लिलिंडर लिक झाल्याने स्फोट होवून चार घरे जळून भस्मसात झाली. शहरातील पिंपळगाव परिसरात आज शनिवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.
शहरातील पिंपळगाव येथे एका घरात गॅस सिलिंडर लीक झाल्याने आग लागली. त्यानंतर आगीने एकापाठोपाठ चार घर कवेत घेतले. यामध्ये योगेश ज्ञानेश्वर ठाकरे, संध्या महादेव पराते, लताबाई कवडे, अरुणा तुळशिराम धुर्वे यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. घरातून धुर निघत असल्याचे निदर्शनास येताच त्या भागातील युवकांनी मदतीसाठी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदचे अग्निशमन दलाचे वाहन दाखल झाले होते. काही वेळातच आगिवर नियंत्रण मिळविण्यात आले. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे घटनास्थळी दाखल झाले होते.