क्राईम न्यूजब्रेकिंग

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला

 

घाटजी : लग्न जुळल्याच्या कारणावरून एकतर्फी प्रेमातून वीस वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला झाल्याची घटना आज मारेगाव रोडवरील शेतात सकाळी दहाच्या सुमारास घडली.
चिंतामण कवडू पुसणाके (२५) रा. घाटी असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली. आज शुक्रवारी तालुक्यातील घाटी येथील एक तरुणी आपल्या मावशीच्या शेतात कापूस वेचणी करिता गेली होते. आरोपीने तू दुस-या सोबत लग्न कसं करतेस असे म्हणून तिच्यावर चाकूने पोटात व पाठीत चार-पाच वार केले. घटनास्थळावरील लोकांनी भ्रमणध्वनीवरून घरच्यांना कल्पना दिली. त्यामुळे तिला तात्काळ घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येऊन पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. सद्यस्थितीत तिच्या वरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तिची प्रकुती स्थिर असल्याचे समजते. आरोपी चिंतामण कवडू पुसणाके यांना पकडण्यासाठी चव्हाण व सुनील केवट यांच्या तीन चमू तयार करण्यात आल्या होत्या. दरम्यान आरोपींने व्यथित होऊन स्वत:वर विषप्रयोग केल्याची माहिती उपलब्ध झाली. त्यामुळे त्याला स्थानिक ग्रामीण रुग्णालयातून यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर भुजाडे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!