विदर्भ

डॉ. सारिका शाह यांना ‘नेल्सन मंडेला वर्ल्ड ह्युमनेटीरयन अवार्ड’

 

यवतमाळ : युनाईटेड नेशन सोबत काम करणा-या डिप्लोमेटीक मिशन, मुंबई या संस्थेच्या वतीने मुंबई अंधेरी वेस्ट येथील मुक्ती कल्चरल हॉल येथे पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात यवतमाळ येथील डॉ. सारिका शाह यांना ‘नेल्सन मंडेला वर्ल्ड ह्युमनेटीरयन अवार्ड’ या अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे.
सामाजिक, चित्रपट, टी.व्ही, मिडीया, फॅशन व विविध क्षेत्रात काम करणा-या लोकांना पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गुजरातचे ऐ.सी.पी. अशोकसिंह चौहाण, प्रसिद्ध फॅशन डिझायनर अर्चना कोचर व अन्य मान्य उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते डॉ. सारिका शाह यांना ‘नेल्सन मंडेला वर्ल्ड ह्युमनेटीरयन अवार्ड’ या अवार्डने सन्मानित करण्यात आले. डॉ. शाह यांना यापुर्वी नॅशनल, इंटरनॅशनल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात काम करून सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रमात भाग घेवून कार्य करीत आहे. हा पुरस्कार मिळाल्या बद्दल डॉ. सारिका शाह यांचे स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!