विदर्भ

सैय्यद अनिस करतोय राष्ट्रभक्तीचे प्रबोधन

 

यवतमाळ : जेथे दोन वेळेच्या जेवणाचे वादे आहे. राहायला घर नाही. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची, दोन पत्राच्या खोलीत आपला संसार थाटलेला . हम दो हमारे दो म्हणत दोन मुलीवर कुटुंब नियोजन करनारा .फक्त वर्ग तिसरी पास झालेला गंवडी काम करून आपल्या परिवाराचा गाडा ओढनारा राष्ट्रभक्तीने प्रेरीत ढाणकीतील सैय्यद अनिस त्याचे राष्ट्राबद्दलचे प्रेम युवकांना चेतना देणारे ठरते.
अनिस रोज मजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा ओढतो . गंवडी काम करीत करीत तो फावल्या वेळेत राष्ट्र भक्तांची पुस्तक वाचतो तिसरी शिकला आहे अनिसला सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, वि दा सावरकर , अब्राहिम लिंकन ,राजमाता जिजाऊ या थोर पुरूष्यांचे चरित्र जणु काही मुखपाठच. रोजोंदारी मिळाली नाही तर शाळा कॉलेजात जावुन सुभाषचंद्र बोस व राष्ट्रभक्त यावर प्रबोधन करतो. मानधणाची कोणतीही लालसा न ठेवता गावा खेड्यात कामाला गेलेला अनिस सुभाषचंद्र बोसच्या राष्ट्रभक्तीचे गुण गाण करीत असतो. राष्ट्र भक्तीने प्रेरित झालेला अनिस दर वर्षी ढाणकीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे. स्वखर्चांने आयोजन करतो.
अनिस म्हणतो की, जात धर्मापेक्षा राष्ट्रप्रेम महत्वाचे आहे. आज युवा पिढीला नेताजी सुभाषचंद्र बोसच्या विच्याराची गरज आहे .अनिसचे सुभाषबाबु वरील प्रेम त्यांच्या विचाराची प्रेरणा पाहुन ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकच्या यवतमाळ जिल्हा सेक्रेटरी पदी त्यांची निवड करण्यात आली. दिवसाकाठी 200 रूपयाचा रोजगार मिळवणारा अनिस जगण्याच्या लढाईचे प्रश्नचिन्ह त्याच्यापुढे उभे आहे राहण्यास घर नाही अश्या बिकट परिस्थीतीत तो राष्ट्र भक्तीचे प्रबोधन करतो. त्याचे राष्ट्रभक्तीचे प्रेम युवकासाठी आदर्श निर्माण करणारे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!