ब्रेकिंग

डोळ्यात मिरची पुड टाकून व्यापा-यांचे 21 लाख लुटले,शस्राने केला हल्ला

 

 

यवतमाळ : कापूस खरेदी विक्रीचा व्यवसाय करणा-या व्यापा-यांच्या डोक्यात मिरची पुड टाकून 21 लाख रुपये लुटले. एवढेच नव्हे तर लुटमार करणा-यांनी शस्त्राने हल्ला करुन व्यापा-यांना जखमी केले. आज 25 जानेवारी सोमवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास उमरी येथील कॅनल जवळ घडली.
रामदास चौधरी,देविदास चौधरी रा दहेगाव ता कळंब जि. यवतमाळ अशी व्यापा-यांची नावे आहेत. त्याचे दहेगाव येथे कृषी केंद असून, ते कापुस खरेदी व विक्रीचा व्यवसाय करतात. 25 जानेवारी रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास ते राळेगाव येथुन आपल्या गावी जात होते. दरम्यान उमरी येथिल कॅनल जवळ तिन ते चार जणांनी व्यापा-यांच्या डोक्यात मिरची पुड टाकली. शस्त्राने हल्ला करुन व्यापा-यांना जखमी केले. व्यापा-यांच्या जवळून 21 लाख रुपये लुटले. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांना मिळताच कळंबचे ठाणेदार अजित राठोड यांनी घटनास्थळ गाठले. जखमीला कळंब ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!