क्राईम न्यूजब्रेकिंग

बी टेकच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

 

  • पुसद : शहरालगतच्या श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असलेल्या पंचवटी हनुमान मंदिर येथील विद्यार्थ्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बीटेकच्या विद्यार्थ्यांने डिप्रेशनमध्ये आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
    ओंंकार अरुण जाधव ( 22) रा. पंचवटी हनुमान मंदिर परिसर असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. उदगीर येथे बीटेक तृतीय वर्षात ओंकार शिकत होता. त्यांनी बीटेक तृतीय वर्षाची हिवाळी परीक्षा दिली होती. दिलेल्या परीक्षेचा दिनांक 23 जानेवारी 2019 रोजी निकाल लागला. डिप्रेशनमुळे आत्महत्या केल्याचे त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. ओंकार जाधव हा हुशार विद्यार्थी असल्याचे त्याच्या शेजाऱ्यांचे म्हणणे असून दिनांक 24 जानेवारीच्या पहाटे पाच वाजताच्या दरम्यान त्याच्या राहत्या घरातील एका खोलीला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या केल्याप्रकरणी वसंतनगर पोलिसांनी त्याचे काका बाबाराव पवार यांच्या जबानी रिपोर्ट वरून मर्ग दाखल केले आहे. प्रकरणाचा अधिक तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दादाराव दोडके हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!