आरोग्य व शिक्षण

दहावी बारावीच्या परीक्षांवर शिक्षकभारती संघटनेचा आक्षेप,परीक्षा पद्धतीत बदल करण्याची मागणी

 

यवतमाळ : नुकत्याच इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केल्या आहेत. या निर्णयात परीक्षा पद्धतीबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे या परीक्षा पारंपरिक पद्धतीनेच घेण्यात येणार का असा प्रश्न शिक्षकांसह पालक व विद्यार्थीवर्गातून उचलल्या जात आहे. शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार यांनी आक्षेप नोंदवून परीक्षा पद्धतीत बदल करण्याची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी दहावी व बारावीच्या शाळा सुरु झालेल्या असल्या तरीही अद्याप एसटी बसेस पूर्णपणे सुरु झाल्या नाहीत. तसेच वसतिगृहे सुद्धा बंदच असल्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य आहे. त्यामुळे आधी बसेस व वसतिगृहे सुरु करण्याची मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

बहुतांश विद्यार्थ्यांचा पाठ्यक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे घेण्यात येणाऱ्या परीक्षा निवडक पाठ्यक्रमावर घेण्यात याव्या तसेच ५० टक्के गुणांकन अंतर्गत (शालेयस्तरावर) देण्याची सोय करावी अशीही संघटनेची मागणी आहे.

विविध महाविद्यालयीन परीक्षा पद्धतीमध्ये ज्या प्रकारे बदल करण्यात आले तसाच बदल दहावी बारावीच्या परीक्षा पद्धतीतही करावा. भर उन्हाळ्यात परीक्षा येत असल्याने परीक्षांच्या वेळेत बदल करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी येण्याजाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणीही शिक्षकभारती संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!