ब्रेकिंगविदर्भ

रेती तस्कराकडून नायब तहसीलदारावर हल्ला,चाकुने केले पोटावर वार

 

उमरखेड : रेतीची अवैधपणे वाहतुक करणारे वाहन पकडण्यासाठी गेलेल्या महसुल विभागाच्या पथकातील नायब तहसिलदार वैभव पवार व तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर रेती तस्करांनी हल्ला चढविला. नायब तहसीलदारांच्या पोटात चाकू खुपसला असून, तलाठ्याला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. ही घटना २३ जानेवारी रोजी रात्री बाळदी रोड वर गावंडे महाविद्यालया जवळ रात्री ११.१५ वाजताचे सुमारास घडली.

तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रातून रोजरोसपणे रेतीचे उत्खन्न करून चोरट्या मार्गाने वाहतुक करण्यात येते. २३ जानेवारी रोजी रात्री रेती तस्करी होत असल्याची माहिती महसुल विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्या आधारे नायब तहसीलदार वैभव पवार व तलाठी गजानन सुरोशे बाळदी रोडवर गावंडे महाविद्यालयाजवळ थांबले होते. यावेळी सात ते आठ तस्करांनी नायब तहसील व तलाठ्यावर शसस्त्र हल्ला चढविला. यामध्ये पवार यांच्या पोटात चाकुने वार केले असून, तलाठ्याला मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागिय अधिकारी स्वप्नील कापडनीस ,उपविभागिय पोलीस अधिकारी वालचंद मुंडे ,ठाणेदार संजय चौबे हे तत्काळ घटनास्थळी पोहचले. जखमी अवस्थेत नायब तहसिलदार वैभव पवार यांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले .प्रकृती गंभीर असल्याकारणाने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. या प्रकरणामुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे .तलाठी गजानन सुरोशे यांनी दिलेल्या तक्रारी वरून उमरखेड पोलीसांनी आरोपी अविनाश चव्हाण रा . यूपीपी कॉलनी उमरखेड ; बिरला व अन्य सहा जणांविरूद्ध भादंवि ३०७ ,३९५ ,३५३ ,३३२ (३४) नुसार गुन्हा नोंदविला आहे . आरोपी अविनाश चव्हाण व बिरला सहआठही आरोपी फरार झाले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून रात्रीच जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ दिलीप भुजबळ अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक खंड़ेराव धरणे,स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सिरसकर हे उमरखेड शहरात दाखल झाले . उमरखेड उपविभागात रेती तस्करी रोखणा-या पथकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. रेती तस्करीत गुंडप्रवृत्तीचा शिरकाव झाल्याने रेती तस्करीला उधाण आले आहे .तस्कर आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहता त्याचेविरुद्ध झोपडपट्टी कायदयाअंतर्गत कार्यवाहीस पात्र आहे अशी प्रतिक्रीया उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस यांनी दिली आहे.

संगम चिंचोली घाटावर निघाल्या होत्या तलवारी

मागील तीन वषार्पासून तालुकयातील रेती घाट हर्रास झाले नाही. त्यामुळे गुंड प्रवृत्तीचे लोक चोरटया मार्गाने रेतीचे उत्खन्न होत आहे.रेती तस्करी रोखण्याचा प्रयत्न केला तर हल्ले करण्याचे प्रकार वाढले आहे. चातारी रेतीघाटावर तत्कालीन सरपंचाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रकार ,संगम चिंचोली घााटावर तस्करांच्या दोन्ही गटाच्या भांडणात तलवारी निघाल्या होत्या. तलाठी गजानन सुरोशे यांच्यावरच दगडथर येथे रेती तस्कराचा एक वषार्पूर्वी हल्ला झाला होता. तीन महिन्यापूर्वी रेतीचे पकडलेले वाहन सोडण्यासाठी तलाठयाने मागीतलेली दिड लाख रुपये रक्कम देऊ शकत नाही म्हणून तहसिलदारांच्या दालनात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रकार हदगावच्या एका रेती माफीयाने केला होता. महसुल प्रशासनातील अधिकारी व कर्मचा-यांच्या खाबुगीरी धोरणामुळे रेती तस्करीची अनेक प्रकरणे गाजली.

जिल्हाधिका-यांनी दिले तात्काळ कारवाईचे आदेश

अवैध रेती वाहतुकीवर आळा घालण्यास गेलेले उमरखेड़ चे नायब तहसीलदार वै•ाव पवार आणि तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर उमरखेड ते ढाणकी रोडवर रेती तस्करांकडून हल्ला करण्यात आला. या घटनेची गंभीर दखल जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतली. आरोपी अविनाश चव्हाण व त्यांच्या इतर साथीदारांवर कडक कलम लावून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिका-यांना दिले आहे. तसेच नायब तहसीलदार आणि तलाठी यांची प्रकृती चांगली असून त्यांना जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण मदत केली जाईल, असेही जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!