
यवतमाळ : येथील दांडेकर नगरमध्ये विजय गाढवे यानी आत्महत्या केली होती. सदर आत्महत्या खून असल्याचा आरोप त्याच्या आईने केला होता. परंतू, अवधुतवाडी पोलिसांनी आत्महत्या असल्याचे सांगून तपास बंद केला होता. त्यामुळे न्याय मिळावा म्हणून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणत गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले होते. त्यावरुन अवधुतवाडीचे तत्कालीन ठाणेदार, विद्यामान ठाणेदार, चौकशी अधिकारी व मृतकाची पत्नी, सासु सह आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
रेश्मा विजय गाढवे (२७), बाबुराव आठवले (६०), छबुबाई बाबुराव आठवले (५०), रिषभ बाबुराव आठवले (२२) रा. दांडेकर ले आउट यवतमाळ, पोलीस हेड कॉस्टेंंबल सतिश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धावळे, तत्कालीन ठाणेदार दिनेश शुक्ला, पोलीस निरीक्षक आनंद वागदकर अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहे. २६ जुन २०१८ रोजी विजय गोविंदराव गाढवे यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी अवधुवाडी पोलिसांनी मर्ग दाखल केला होता. मृतकाची आई भिमाबाई गोविंदराव गाढवे रा. गुरुनानक नगर गोदणी रोड यवतमाळ यांनी विजयला सासरच्या मंडळीनी मारल्याचा आरोप करून तक्रार अवधुतवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. परंतू , तपास अधिकारी, ठाणेदारांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेता विजय गाढवे यानी आत्महत्या कली असे म्हणून तपास बंद केला होता. त्यामुळे भिमाबाई गाढवे यानी माहिती अधिकारी, उच्च न्यायालय खंडपीठात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फिर्यादीच्या मलाच्या मृत्यूस सासरची मंडळी जबाबदार असून, खुनाचा गुन्हा दाखल करावा असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. त्यावरून अवधुतवाडी पोलीस ठाण्यात भादंवि ३०२,३०६,३४, १६६,१६६ (अ),३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला.