विदर्भ

यवतमाळ – मूर्तीजापूर रेल्वे ब्रॉडगेज करण्याची मागणी,पालकमंत्र्यांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र

यवतमाळ : जिल्ह्याच्या विकासाच्या तसेच दळणवळणाच्या दृष्टीने यवतमाळ – मूर्तीजापूर नॅरोगेज रेल्वे लाईन ब्रॉडगेज करण्याची मागणी राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केली आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिले आहे. रेल्वेमंत्र्यांनी सदर पत्र संबंधित विभागाला पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे. तशी पोच त्यांनी पालकमंत्र्यांना पाठविली आहे.
जवळपास 150 वर्षांपूर्वी यवतमाळ – मूर्तीजापूर शकुंतला नॅरोगेज रेल्वे लाईनची निर्मिती ब्रिटीश कंपनी निक्सन ने केली होती. या कंपनीचा करार संपल्यामुळे सदर रेल्वे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या रेल्वेलाईनला ब्रॉडगेज केली तर जिल्ह्यात दळणवळणाच्या सोयीसुविधा निर्माण होण्यास मोठी मदत मिळेल. एवढेच नाही तर मुंबई – हावडा या मुख्य रेल्वे लाईनसोबतसुध्दा यवतमाळ – मूर्तीजापूर ही रेल्वे जोडली गेल्यास जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी यांना बाजारपेठेची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे या नॅरोगेज रेल्वे लाईनचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करावी, अशी मागणी पालकमंत्र्यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!