ब्रेकिंगविदर्भ

यवतमाळ जिल्ह्यात एक मृत्यु; 69 जण नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ : गत 24 तासात जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 69 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये कळंब तालुक्यातील 84 वर्षीय पुरषाचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 57 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 1160 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 69 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 1091 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 351 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 13880 झाली आहे. 24 तासात 57जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 13045 आहे. तर जिल्ह्यात एकूण 423 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 134770 नमुने पाठविले असून यापैकी 134358 प्राप्त तर 412 अप्राप्त आहेत. तसेच 120539 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!