ब्रेकिंगविदर्भ

बर्ड फ्ल्यू : ‘त्या’आठ मोराचे नमुने पॉझिटीव्ह

 

यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात आठ मोरांचा मृत्यू झाला होता. तर केळापूर तालुक्यातील लिंगटी येथे पक्षांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले होते.बर्ड फ्ल्यूचा संसर्ग होवू नये म्हणून जिल्हा प्रशासनासह पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला आहे. मृत झालेल्या पक्षांचे नमुने तपासणीकरीता भोपाळला पाठविण्यात आले होते. मृत झालेल्या मोर पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. आर्णी तालुक्यात १० किमी क्षेत्र प्रतिबंधीत करण्यात आला आहे.
देशासह राज्यात बर्ड फ्ल्यूची शिरकाव झाला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी केळापूर तालुक्यात लिंगटी परिसरातील कुक्कुटपालन केंद्रात २८६ पक्षांचा संशयित मृत्यु झाला होता. तर आर्णी तालुक्यात आठ मोराचा मृत्यू झाला. दारव्हा तालुक्यात चार वराह, घाटंजी परिसरात चार कावळे आणि यवतमाळातील दोन कावळ्यांचा मृत्यु झाला होता. यवतमाळ जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा संसर्ग होवू नये म्हणून प्रशासन अलर्ट झाले आहे. मृत्यू झालेल्या पक्षाचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. आर्णी तालुक्यात मृत्यू झालेल्या आठ मोरांचा पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. ज्या भागात मोरांचा मृत्यू झाला आहे त्या ठिकाणापासून १० किमी अंतरापर्यंत प्रतिबंध क्षेत्र घोषित केल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बी.आर. रामटेके यांनी दिली.

खैरी येथे कोंबड्यांचा मृत्यू

राळेगाव तालुक्यातील खैरी येथे १५० कोंबड्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या बाबतची माहिती मिळताच पशु संवर्धन वि•ाागाचे उपायुक्त डॉ. बी.आर. रामटेके, पशु वैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचा-यांनी खैरी येथे दाखल झाले. मृत्यू झालेल्या कोंबड्याचे नमुनेही प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार आहे. त्या नंतर कोंबड्याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!