संपादकीय व लेख

महापुरुषांचे विचार कालबाह्य होत नाही – प्राचार्य गजानन उईके

अंबिका महाविद्यालयात राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद जयंती साजरी

 

नेर : महापुरुषांची कार्ये, विचार आणि त्यांचे परिणाम त्यांच्या जिवनकाळापुरते सीमित नसतात. मृत्यू नंतरही त्यांचे कर्म आणि विचार कायम जिवंत राहतात. ते कालबाह्य होत नसल्याचे प्रतिपादन प्राचार्य गजानन उईके यांनी केले.
नेर एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित तालुक्यातील मांगलादेवी येथील अंबिका महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्य अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
यावेळी अध्यक्ष म्हणून प्राचार्य गजानन उईके, सत्कारमूर्ती पत्रकार प्रवीण पाटमासे, गौरव नाईकर, प्रमुख उपस्थिती म्हणून मनोज दुधे, गुलाबराव सोनोने, गजानन खरले हे होते. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. तसेच अंजली इंगळे आणि राधिका हिमाने या विद्यार्थिनींनी स्वागतगीताद्वारे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
पुढे अध्यक्षीय भाषणात बोलत असताना ते म्हणाले की, हिंदू धर्माची व्याख्या स्वामी विवेकानंदांनी एकात्मतेच्या भावनेतून मांडली होती. त्यांना त्यावेळी आपले विचार स्वतंत्रपणे मांडण्यासाठी देखील अवहेलनेला सामोरे जावे लागले होते.शिक्षण, धर्म, संस्कृती ,आचरण याबाबतचे थोर महापुरुषांचे विचार कालबाह्य होत नाही. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांनी आपले करिअर निवडण्यासाठी परिस्थीच्या पळवाटा शोधण्यापेक्षा, जिद्द आणि चिकाटीला परिश्रमाची जोड देऊन यश संपादन करायला हवे. प्रवीण पाटमासे बोलतांना म्हणाले की, पुस्तकी ज्ञान संपादन करणे, परीक्षा उत्तीर्ण होणे पदव्या प्रमाणपत्र मिळवणे एवढीच शिक्षणाची व्याख्या नसून शिक्षणातून माणूस म्हणून जगता आले पाहिजे. आपले जीवन प्रगल्भ करून चारित्र्याची बांधणी करणे तेवढेच महत्वाचे आहे. नंतर गुलाबराव सोनोने गौरव नाईकर, यांनी आपले विचार मांडले. सोबतच तनुजा गंधे, आचाल मोहुर्ले, गीता सोनवणे या विद्यार्थिनींनी स्वामी विवेकानंद, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यावर भाषणे केली.
कार्यक्रमाचे संचालन दिनेश लांजेकर यांनी केले तर आभार सायली जोगे हिने केले. यावेळी कांचन परोपटे ,दिलीप माहुरे, अमित ढोमने, प्रा.अमोल घरडे, प्रशांत जाधव, विजय उघडे आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.

चौकट

पत्रकारिता आणि सामजिकक्षेत्रातील नाव युवकांचा सत्कार

पत्रकारितेत वेगळं वलय निर्माण करून स्वतंत्र ओळख निर्माण करणारे पत्रकार प्रवीण पाटमासे आणि शेतकऱ्याचे हरवलेले ५० हजार रुपये परत करून सामजिक दायित्वाचा परिचर देणारे सामजिक कार्यकर्ते गौरव नाईकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!